हायलाइट्स:
- देशात करोना परिस्थिती नियंत्रणात
- रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा नियमांत बदल
- प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर कमी केले
भारतीय रेल्वेकडून आपल्या ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ दरांत पुन्हा एकदा बदल करत हे दर कमी करण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिलीय.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल यांसहीत अनेक रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दरात घट करण्यात आलीय. आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी नागरिकांना ५० रुपयांऐवजी केवळ १० रुपये मोजावे लागणार आहेत.
करोना काळात प्लॅटफॉर्म तिकीट दरांत वाढ करत रेल्वेकडून अनेक स्थानकांवर या तिकीटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते.
याशिवाय, करोना लसीच्या दोन मात्रा पूर्ण करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेणारे मध्य रेल्वेचे प्रवासी यापुढे मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) अॅपद्वारे आपल्या मोबाईल फोनवर सिंगल तिकीट आणि महिन्याचा पास काढू शकणार आहेत.
यूटीएस अॅप अँन्ड्रॉईड फोनवर अगोदरपासूनच उपलब्ध होते. आज रात्रीपासून अॅप आयओएस फोनवरदेखील उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा वापर उद्यापासून शक्य होणार आहे.
अॅपद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या या सुविधेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसं रेल्वे तिकीट काऊंटरवर दिसून येणारी गर्दीही कमी होण्यास मदत होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times