बारामती : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर इथे रास्तारोको करणारे शेतकरी आणि पोलीस यांच्यात धरपकड झाल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पायी चालत बारामतीत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाकडे आगेकूच केली आहे. इतकंच नाहीतर उर्जाभवन या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

‘शेतकरी एकजुटीचा विजय असो! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा घोषणा देत बारामती तालुक्यात प्रवेश करून शेतकरी पायी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाकडे निघाले आहेत. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी विज खंडित केल्यामुळे आंदोलन करत होते. त्या ठिकाणी निषेध नोंदवल्यानंतर ते आंदोलक इंदापूर-बारामती राज्य महामार्गावरती रास्ता रोको करण्यासाठी सरसावल्यानंतर पोलिसांनी त्यांना रस्त्यावरती बसण्यासाठी मज्जाव केला.

धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, पत्नी आणि दोन मुलं पोरकी
यातून पोलीस आणि शेतकरी यांच्यात धरपकड झाली. त्यामुळे आंदोलकांनी बारामती हद्दीत आम्ही जात असल्याचे त्यांनी सांगत आक्रमक भुमिका घेतली आहे.

‘शासनाने पगारवाढीचं गाजर दिलं’, एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला पुन्हा अल्टीमेटम

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here