हायलाइट्स:
- मंत्रिमंडळ बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती
- सहकाऱ्यांचे मानले आभार
- उपचाराबाबतही दिली माहिती
बैठकीत ऑनलाईन उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असंही ते म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
मंत्रिमंडळ बैठकीत कोव्हिड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.
दरम्यान, ‘कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं, तसंच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत,’ या मुद्द्यांवरही मंत्रिमंडळ सदस्यांनी चर्चा केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
It’s too bad to check your article late. I wonder what it would be if we met a little faster. I want to exchange a little more, but please visit my site casino online and leave a message!!