मुंबई: जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली असून, त्यामुळे स्वातंत्र्योत्तर ७० वर्षे भारत देश अखंड, सार्वभौम राहिला. लोकशाही दिवसेंदिवस मजबूत झाली. याचे श्रेय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासीयांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगभारात पोहाचावे यासाठी आणखी एका व्यासपीठाची निर्मिती केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यत पोहोचावे यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. बाबा खेळा असं त्याचं नाव असून लवकरच हा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी खुला होणार आहे.
आई होणार स्वरा भास्कर, म्हणाली- मुलासाठी अजून नाही थांबू शकत
या प्लॅटफॉर्मवर पहिला ‘कोटा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एका दलित विद्यार्थ्याचं आयुष्य दाखण्यात येणार आहे. जातीय बेदभाव, उच्च वर्णीयांकडून बहुजणांचे होणारे शोषण ही या चित्रपटाची कथा असणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here