याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी तपासासाठी एकूण सात तपास पथके तयार केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे देऊळगावमही, धोत्रा नंदाई या गावात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आणि आरोपी राहुल किसन जायभाये (वय २३ वर्ष रा. देऊळगांवमही ता. देऊळगांव राजा), राहुल अशोक बनसोडे (वय २० वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा) आणि नामदेव पंढरीनाथ बोंगाणे (वय २० वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा) यांना २५ नोव्हेंबर रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी चिखली येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील अटक आरोपींची तपासादरम्यान चौकशी केली असता यातील आरोपी राहुल किसन जायभाये हा सहा महिन्यांपूर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात होम थिएटर घेण्यासाठी आला होता. तेव्हा होमथिएटरच्या किंमतीवरुन त्यावेळी आरोपी व कमलेश पोपट यांचे वाद झाले होते. त्याचा राग डोक्यात ठेवून त्यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचून ही हत्या केली.
.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times