हायलाइट्स:
- किमान हमीभावाची शेतकऱ्यांची मागणी
- आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्ली सीमेवर गोळा
- दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ
सुरक्षेत वाढ
दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांनी जमा होत आपली एकजूट पुन्हा दाखवून दिलीय. मात्र, यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण दिसून येतोय. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा मोठ्या संख्येत बॅरीकेडस् उभारण्यात आले आहेत. तसंच सुरक्षादलाच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

टिकरी सीमेवरील एक दृश्यं
पोलिसांचं आवाहन
कोणत्याही प्रकारे कायदा आपल्या हातात घेऊ नये. कायदेव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहन वारंवार दिल्ली पोलिसांकडून गर्दीला करण्यात येतंय.
दिल्ली ट्राफिक पोलिसांकडूनही नागरिकांची असुविधा टाळण्यासाठी वाहतुकीची आणि ट्राफिकची माहिती विविध माध्यमांतून दिली जातेय. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी सकाळपासून गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे.
शेतकरी संघटनांकडून आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्तानं शेतकऱ्यांना २६ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर गोळा होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर हरयणा, पंजाबमधून मोठ्या संख्येत शेतकरी दिल्ली सीमेवर दाखल होत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानंतर कृषी मंत्रालयाकडून कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. संसदेत हे विधेयक संमत झाल्यानंतर कृषी कायद्यांच्या माघारीची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times