पुणे हत्याकांड क्राइम पेट्रोल: पुणे : लॉजवर विवाहितेचा खून तर तरुणाची साडीने गळफास घेत आत्महत्या, कारण वाचून पोलीस हादरले – pune news today murder of a married woman at a lodge and suicide of a young man
पुणे : पुण्यात काही झालं तरीही गुन्ह्यांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आजही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. दिघी येथे एका लॉजमध्ये महिलेचा गळा आवळून स्वतः आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता समोर आला असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (आजची पुण्याची बातमी लॉजवर विवाहितेची हत्या आणि तरुणाची आत्महत्या)
प्रकाश महादेव ठोसर (२८, चिंचवड) असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नावं आहे. तर महिला ३५ वर्षीय असून विवाहित तीला एक मुलगी आणि मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. विवाहितेचा पती ४ वर्षांपासून एका खून प्रकरणी कारागृहात आहे. प्रकाश आणि विवाहितेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ते अथर्व लॉजवर नेहमीच जात असत. बुधवारीसुद्धा ते दिघीतील अथर्व लॉजवर गेले होते. देह व्यापारावर बंदी आणण्यात आल्यानंतर न्यायालयात महिलांसाठी महत्त्वाची मागणी दोघांत काहीतरी वाद झाले आणि प्रकाशने महिलेचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः साडीचा फास घेऊन आत्महत्त्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजता लॉज सोडणार होते. पण त्यांनी ते बाहेर न आल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने बाहेरून आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पोलिसांना माहिती देऊन दरवाजा उघडला असता दोघे मृतावस्थेत दिसले.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे दोघांचे मृतदेह नग्नवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (pune news today Murder of a married woman at a lodge and suicide of a young man)