परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय वातावरण आधीच खवळून निघालं असून आपण शरद पवार यांचे पाईक असून राष्ट्रवादी सोडणार नाही, असं वक्तव्यही बाबाजानी यांनी केलं होतं.
मात्र, दुरांनींच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत असलेले दुर्रानी यांचे समर्थक पदाधिकारी जिल्हा भरातून राजीनामे देत आहेत. परभणीत काल ७८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या ४०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह अध्यक्ष जयंत पटलांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. तर दुसरीकडं दुर्रानी यांचाही आता सूर बदलला असून, मुंबई वारी झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची राजकीय दिशा ठरवणार असल्याचे दुर्रानी यांनी स्पष्ट केले आहे. पुणे : लॉजवर विवाहितेचा खून तर तरुणाची साडीने गळफास घेत आत्महत्या, कारण वाचून पोलीस हादरले खरंतर, दुरांनी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात ७ वर्षात अनेक निवडणुकीत विजय मिळाला असून आता पक्ष श्रेष्ठींनी आमदार दुर्रानी यांच्या राजीनामा नामंजूर करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहेत. जर असं झालं नाही तर राष्ट्रवादीला याचा आगामी काळात मोठा फटका बसू शकतो अशीही राजकीय चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावर पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.