हायलाइट्स:

  • संपत्तीच्या वादातून नातूच झाला आजीचा वैरी
  • १०६ वर्षांच्या आजीला नातवाने जमिनीवर आपटले
  • घर आणि संपत्ती नावावर करून न दिल्याने कृत्त
  • मध्य प्रदेशातील इंदूरमधील धक्कादायक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अशा घटनांवरून नात्यांपेक्षा संपत्तीला मोठी असल्याचे दिसून आले आहे. संपत्तीच्या वादातून एका नराधम नातवाने आपल्याच १०६ वर्षांच्या आजीला जमिनीवर आपटले. यात आजी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपी नातवाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

संपत्तीच्या वादातून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या घटना याआधीही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. संपत्तीची लालूच माणसाला कुठल्या थराला घेऊन जाते, याचे उदाहरण मध्य प्रदेशातील इंदूरमधील खजराना हद्दीत बघायला मिळाले. आपल्या १०६ वर्षांच्या आजीवर तिच्या नातवानेच हल्ला केला. त्याने आपल्या आजीला उचलून जमिनीवर आपटले. यात वृद्ध आजी गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात उपचार घेत आहे. इस्लाम पटेल असे आरोपी नातवाचे नाव आहे. संपत्ती आणि घर त्याच्या नावावर न केल्याने रागाच्या भरात त्याने आपली आजी बिस्मिल्लाहबी यांना उचलले आणि जमिनीवर फेकून दिले. या घटनेनंतर आजीची हाडे मोडली आहेत. तिच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.

एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले, प्रयागराज सामूहिक हत्याकांडाने हादरला
BJP leader Murdered in Nashik: नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

आरोपी फरार, शोध सुरू

इंदूरच्या खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. खजराना पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नातवाने आपल्या १०६ वर्षांच्या आजीला जमिनीवर फेकून दिले. यात आजी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपी नातवाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. वृद्धेला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही घटना खूपच दुर्दैवी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आरोपी नातूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

मध्यरात्री धावत्या कारमध्ये सुरू होता भयानक प्रकार, किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर…
चिमुरड्याला काकानं जीपमधून फिरवून आणलं, गेटवर रिव्हर्स घेताना चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here