SCTIMST मधील एक डॉक्टर स्पेनमधून १ मार्च भारतात आले होते. त्यांची रविवारी करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले. हे डॉक्टर २ मार्चला कामावर रूजू झाले. यानंतर ८ मार्चला त्यांचा घसा दुखू लागला. कामावर असताना त्यांनी मास्क घातला होता. १० आणि ११ तारखेला त्यांनी रुग्णांची तपासणीही केली होती. अखेर १२ तारखेला त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं. करोनाचा प्रादुर्भाव झालेला देशांमध्ये स्पेनचाही समावेश आहे. १४ मार्चला त्या डॉक्टरांची पुन्हा करोना चाचणी केली गेली. या चाचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचं रविवारी स्पष्ट झालं.
इन्स्टिट्युटमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनाच निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याने इन्स्टिट्युटच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, ज्या ३० डॉक्टरांना देखरेखीखाली ठेवलंय त्या पैकी काही डॉक्टरांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभाग घेतला होता. यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.
SCTIMST हे इन्स्टिट्युट केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येतं. कार्डिऑलॉजी आणि न्यूरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर या SCTIMST मध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times