२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमाप्रमाणेच आजचा ‘ २’ हा सिनेमाही भ्रष्टाचारावर भाष्य करतो. भ्रष्टाचाररुपी कीडला नष्ट करण्यासाठी शेतकरी असलेले दादासाहेब आझाद पहिल्यांदा आवाज उठवतात आणि या लढ्याला ‘सत्या आझाद’ आणि ‘जय आझाद’ हे मूर्त रूप देतात. सत्या आणि जय ही दादासाहेब यांची जुळी मुलं असतात. सत्या राज्याचा गृहमंत्री बनतो, तर जय पोलिस यंत्रणेत एसीपी पदावर असतो. त्यांच्या लहानपणीच लढ्यात दादासाहेब यांची हत्या झालेली असते. वडील आणि दोन मुलं अशा तिन्ही भूमिका जॉन अब्राहमनंच साकारल्या आहेत. जॉन आणि सिनेमांच्या व्हीएफएक्स टीमचं, संकलकाचं कौतुक करायला हवं.
कथानकात सत्या आझाद राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ‘भ्रष्टाचारविरोधी विधेयक’ विधानसभेत मंजूर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र, विधानसभेत त्यांचे सहकारी, पक्षाचे सदस्य त्यांना पाठिंबा देत नाहीत. या विधेयकाला सभागृहात बहुमत न मिळाल्यानं सत्या निराश झाला आहे. दरम्यान, शहरात काही खुनाच्या घटना घडतात. यात जे ‘भ्रष्ट’ आहेत त्यांचा खून होतो. आता या खुनाचा छडा लावण्यासाठी एसीपी जय आझाद अर्थात गृहमंत्री असलेल्या सत्या यांच्या भावाला पाचारण करण्यात येतं. एसीपी जय आणि गृहमंत्री सत्या हे प्रकरण कसं हाताळतात, यात सिनेमाची गोष्ट दडलेली आहे.
सिनेमाचं भव्य निर्मितीमूल्य, आवाका, मेलोड्रॅमॅटिक अभिनय, व्यावसायिक गाणी असं सर्व काही चकचकीत आहे. तरीही सिनेमाचं ‘दिसणं’ आणि दिग्दर्शकाची कथानकाची मांडणी पचनी पडत नाही. सिनेमात एकीकडे सामाजिक विषय मांडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी लेखनात लेखकानं भान ठेवलेलं नाही. सिनेमाचं पार्श्वसंगीत आणि जॉन अब्राहमचा अभिनय ही सिनेमाची जमेची बाजू आहे. ‘जन गण मन…’ हे गाणं प्रभावी आहे. सिनेमागृहातून बाहेर पडताना आपण हे गाणं बरोबर घेऊन जातो. जॉनचे चाहते असलेल्यांसाठी हा सिनेमा मेजवानी आहे.
सिनेमा : सत्यमेव जयते २
निर्मिती : टी सीरीज, एम्मी एंटरटेन्मेंट
लेखन/ दिग्दर्शन : मिलाप झवेरी
कलाकार : ,
छायांकन : डुडले
संकलन : माहीर झवेरी
दर्जा : २.५ स्टार
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times