नाशिक : नाशिकमधील भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्येनंतर राजकारणात आधीच खळबळ उडाली होती. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल इघे ची हत्या करणारा संशयित आरोपी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय युनियनच्या अस्तित्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी विनायक बर्वे राष्ट्रवादीच्या कामगार वंचीत आघाडीचा पदाधिकारी असून त्याने गेल्या महिनाभरापूर्वी संशयित आरोपी विनायक बर्वे याने भाजपला सोडचिठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बर्वेने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

खरंतर, या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याने पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडल अध्यक्ष होते. सातपूर परिसरातील कार्बन नाका भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

राष्ट्रवादीला पडणार खिंडार? ४०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे राजीनामे
सातपूर परिसरात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून, गेल्या चार दिवसांमध्ये तीन हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामगार युनियनच्या कामाकरिता सकाळी सहा वाजताच्या सुमारास ते सातपूर एमआयडीसीमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे अंतर्गत वाद झाले. त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात आता पेट्रोल पंपावर मिळतेय लस

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here