मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नाच्या बंधनात अडकले आहे. आता सगळ्यांचे लक्ष कतरीना आणि विकी यांच्या लग्नाकडे लागले आहे. मीडियामध्येही या दोघांच्या लग्नाचीच चर्चा आहे. असे असताना विकीच्या मावस बहिणीने एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या वृत्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आणि यांचे लग्नाच्या चर्चा होत होत्या. दिग्दर्शक कबीर खानच्या घरी विकी आणि कतरिनाची ‘रोका सेरेमनी’ पार पडल्याच्याही बातम्या समोर आल्या. त्यानंतर डिसेंबरच्या दुस-या आठवड्यामध्ये हे दोघे राजस्थानमधील जोधपूर येथील ‘सिक्स सेन्स फोर्ट’मध्ये लग्न करणार असल्याची बातमी आली. त्यानंतर सातत्याने त्यांच्या लग्नासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर एक नवीन गोष्ट समोर आली आहे. विकी आणि कतरिना लग्न करणार नाहीत, असा खुलासा विकीच्या एका जवळच्या नातेवाईकाने केला आहे. यावरून आता या दोघांच्या लग्नाबद्दल शंका व्यक्त होऊ लागली आहे.

काय? विकीचं लग्न? छे…ही तर अफवाच

विकी आणि कतरिना यांचे लग्नाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या पार्श्वभूमीवर विकीच्या मावसबहिणीने एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. विकीची मावस बहीण डॉ. उपासना वोहरा यांनी एका मुलाखतीमध्ये विकी आणि कतरिना लग्न करणार नसल्याचे सांगितले आहे. या दोघांचे लग्न या फक्त मीडियामध्ये सुरू असलेल्या अफवा असल्याचेही डॉ. वोहरा यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. डॉ. वोहरा कौशल कुटुंबाच्या निकटच्या असल्याने त्यांनी केलेले हे वक्तव्याला महत्त्व आहे. त्या पुढे म्हणाल्या की, ‘दोघांच्या लग्नाच्या तयारीपासून ते लग्नाच्या तारखांपर्यंतच्या अनेक बातम्या मीडियामध्ये पसरल्या आहेत. अशा बातम्या निव्वळ अफवा आहेत. दोघे लग्न करणारी नाहीत. ते खरेच लग्नाचा विचार करत असते, तर त्यांनी नक्कीच जाहीर केले असते. बॉलिवूडमध्ये अनेकदा अशा अफवा उडतात आणि नंतर लक्षात येते, की प्रकरण काहीतरी वेगळेच होते. माझे काही दिवसांपूर्वीच विकीशी बोलणे झाले आहे. लग्नाबाबत तो काहीही बोलला नाही. हा विषय मी जास्त ताणून धरणार नाही. परंतु विकी आणि कतरिना लग्न करणार नाहीत, ही गोष्ट मात्र खरी आहे,’ अशी ठाम प्रतिक्रिया डॉ. उपासना वोहरा यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.

दरम्यान, विकीच्या मावस बहिणीनं लग्नाचं वृत्त फेटाळलं असलं, तरी चाहते यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. लग्नाबाबत गुप्तता राखण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here