हायलाइट्स:
- शिक्षक सहकारी शिक्षक टीझर
- अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपी शिक्षकाला केली अटक
- राजस्थानमधील धौलपूर येथील धक्कादायक घटना
- सहकारी शिक्षकांनी व्यक्त केला संताप, कठोर कारवाईची मागणी
आरोपी हा विज्ञानाचा शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. अटकेनंतर शिक्षण विभागाकडून त्याच्याविरोधात निलंबनाची कारवाईही होऊ शकते, असे बोलले जात आहे. या घटनेनंतर शाळेतील सहकारी संताप व्यक्त करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे कृत्य सहन केले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया अन्य शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे शाळेची बदनामी होत असून, याचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होत आहे. दोषी आढळल्यानंतर आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतरही शिक्षक हायस्कूलमध्ये जात होता. त्यानंतर हजेरी लावून स्वाक्षरी केल्यानंतर तो पुन्हा गायब व्हायचा. आरोपीने याआधीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे. या घटनेनंतर पीडित शिक्षिका खूपच घाबरलेली होती. ज्यामुळे ती हायस्कूलमध्ये येताना आपल्या आईला सोबत घेऊन यायची. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने अनेकदा आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काहीही ऐकले नाही. उलट त्याचे गैरवर्तन वाढले. त्यानंतर त्रासलेल्या पीडितेने पोलिसांत धाव घेतली आणि शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केला.
पोलिसांनी आरोपीला केली अटक
या प्रकरणी कौलारी पोलिसांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी हायस्कूलमधील शिक्षिकेसोबत छेड काढल्याची घटना समोर आली आहे. त्याच शाळेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिकेवर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times