नवी दिल्ली- अभिनेता
अनिल कपूर यांनी नुकताच जर्मनीतील स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओचं कॅप्शन वाचल्यानंतर त्यांचे चाहते आणि शुभचिंतक काळजीत पडले असून सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारणा करत आहेत. अनिल यांच्या फिटनेसचं नेहमीच कौतुक होत असतं. अशात त्यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात सांगितले की काल (शुक्रवार २६ नोव्हेंबर) रोजी त्यांच्यावरील उपचारांचा शेवटचा दिवस होता आणि ते डॉक्टरांना भेटायला जाणार आहेत.
अनिल कपूर यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली आणि त्यांनी कमेन्ट करत अनिल यांना नक्की काय झालंय आणि आता ते कसे आहेत यासंबंधी प्रश्न विचारू लागले. इथे पाहा चाहत्यांच्या कमेन्ट-
व्हिडिओमध्ये अनिल कपूर बर्फवृष्टीदरम्यान जर्मनीच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘बर्फात चालणं नेहमीच सर्वोत्तम असतं. आज जर्मनीतला शेवटचा दिवस. मी माझ्या उपचाराच्या शेवटच्या दिवशी डॉ. म्युलर यांना भेटणार आहे. त्यांच्या जादुई स्पर्शाबद्दल मी खूप आभारी आहे.’
अनिल कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी ते ‘मलंग’ आणि ‘एके वर्सेस एके’ मध्ये दिसले होते. लवकरच ते ‘जुग जुग जिओ’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Like this:
Like Loading...