म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईतील ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या या दोन्ही कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सांगण्यात आले. खबरदारी म्हणून या दोघांनाही अंत्यसंस्काराची परवानगीही नाकारण्यात आल्याचे समजते.

वाचा:

दोघांनीही विलगीकरण कक्षामध्येच त्याचे अंतिम दर्शन घेतले. संसर्ग पसरू नये, यासाठी मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृतदेह विशिष्ट वैद्यकीय आवरणाने झाकण्यात आला. संसर्ग पसरू नये, यासाठी डॉक्टरांनाही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते. द्यावी लागणार निःशुल्क सेवा खासगी रुग्णालयांमध्येही करोना संशयित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भात पालिकेने चर्चा केली आहे. मात्र या रुग्णालयांनी ही सुविध मोफत द्यावी, असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

वाचा:

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाबाबत निर्धारित केलेल्या श्रेणीनुसार ब गटातील, म्हणजेच संशयित गटातील अधिक रुग्ण आखाती देश तसेच युरोपामधून येण्याची शक्यता आहे. विलगीकरणासाठी पालिकेची तयारी आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. विमानांच्या वेळानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. बोर्डिंग करताना तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रवासीसंख्या कमी असण्याची शक्यता आहे.

वाचा:

वाचा:

गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनं मॉल, शाळा, महाविद्यालय अशा गर्दीच्या ठिकाणं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीतील साई मंदिरासह राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. पुणे, नागूपरसारख्या महानगरांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here