मुंबई- सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी, सलमानने मुंबईत चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित केला होता, ज्यामध्ये अनेक बी-टाऊन स्टार्सनी हजेरी लावली होती. पण या प्रीमिअरला असे काही घडले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत असून चाहते सलमानचं कौतुक करताना थकत नाहीएत.

सलमान खान

‘अंतिम’ च्या प्रीमिअरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान एका वृद्ध महिलेकडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. खरे तर सलमान चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी जात असताना वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली. सलमानला पाहून वृद्ध महिला त्याच्याकडे येते आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देते. सलमानही त्या महिलेसाठी थांबला आणि त्यांच्याशी आपुललकीने बोलला. त्यांचा हात धरून त्याने काही फोटोही काढले.


सोशल मीडियावर सलमानच्या याच व्हिडिओ आणि फोटोंचा बोलबाला आहे. व्हिडिओमध्ये चाहते ‘सलमानजी लव्ह यू’ ओरडताना दिसत आहेत. चाहते ‘भाईजान’चं कौतुक करताना थकत नाहीत. विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहते कमेन्ट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘सलमान भाईला स्टार असल्याचा कोणताही अभिमान वाटत नाही. म्हणूनच प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘सोने के दिल वाले है सल्लू भाई.’ इथे वाचा इतर चाहत्यांच्या कमेन्ट-

चाहत्यांच्या कमेन्ट

अंतिम: अंतिम सत्य‘च्या प्रीमिअरला सलमानच्या कुटुंबासोबतच अनेक सेलिब्रिटी पोहोचले. यामध्ये संगीता बिजलानी, गौतम गुलाटी, बॉबी देओल, एकता कपूर आणि जेनेलिया डिसूझा यांचा समावेश होता. ‘अंतिम’ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून या सिनेमातून टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.



Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here