राजस्थानमधील एका १३ वर्षीय मुलीने तिच्या आवडत्या स्टारसाठी खास गिफ्ट तयार केले, जे पाहून राजेश भावुक झाला. खरंतर या मुलीने राजेशचं मल्हारराव होळकर या प्रसिद्ध पात्राचे काही फोटो गोळा केले आणि ते सारे उशीच्या कव्हरवर छापून राजेशला पाठवले. नेहमीप्रमाणे राजेश सेटवर पोहोचला तेव्हा ही भेट पाहून तो दंग झाला.

राजेश शृंगारपुरे म्हणाला की, ‘ही भेट पाहून मी भावुक झालो. १३ वर्षांच्या मुलीने विशेषतः माझ्यासाठी तिचा बहुमोल वेळ काढून माझे फोटो गोळा करून इतकी सुंदर भेट तयार केली. हा क्षण मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन.’ दरम्यान, दुसरीकडे राजेशने नुकतीच त्याची पहिली लक्झरी कार विकत घेतली. त्याने मर्सिडीज बेंझ खरेदी केली आहे. इतक्या वर्षांनी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकल्याने राजेश खूश फार खूश होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times