हायलाइट्स:

  • फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल
  • ‘सरकारने काही कामच केलेलं नाही तर मूल्यमापन कसं करणार?’
  • अमित शहा भेटीवरही पुन्हा केलं भाष्य

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १५ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यानंतर आज भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न असलेल्या शिवश्रृष्टीबद्दल भाष्य केलं. तसंच फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे)

‘जिथं कामगिरी असते तिथं मूल्यमापन केलं जातं, या सरकारने काही कामच केलेलं नाही तर मी त्याविषयी कसं बोलणार?’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.

Guidelines For Marriage: राज्यात विवाह सोहळ्यासाठी आता असतील ‘हे’ नियम; उल्लंघन झाल्यास…

एका मराठी वृत्तवाहिनीने ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांचा कल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणामध्ये आज निवडणुका झाल्यास पुन्हा एकदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकेल, असा निष्कर्ष समोर आला आहे. मात्र त्याचवेळी भाजप हाच सर्वात मोठा पक्ष असेल, असंही हा सर्वे सांगतो. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी अद्याप या सर्वेक्षणाचे आकडे पाहिलेले नाहीत. मात्र तुम्ही जे सांगत आहात त्यानुसार आजही भाजप हाच राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरत आहे, याबाबत आनंद आहे.’

पटोलेंची स्वबळाची घोषणा; मात्र, बाळासाहेब थोरातांनी दिले ‘हे’ संकेत

अमित शहा यांच्या भेटीबद्दल काय म्हणाले फडणवीस?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. पाटील यांच्या पाठोपाठ फडणवीस हेदेखील अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे भाजपमध्ये नेमक्या काय राजकीय हालचाली सुरू आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होते याबाबत आता फडणवीस यांनी खुलासा केला आहे. ‘अमित शहा यांची भेट राजकीय कारणांसाठी नव्हती. मात्र आम्ही दिल्लीत गेल्यानंतर आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटत असतो. अमित शहांसोबतची बैठक ही संघनात्मक बाबींसाठी होती,’ असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या सत्ताबदलाच्या भविष्यवाणीबद्दलही प्रश्न विचारला. मात्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here