हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवनियुक्त जिल्हा बँक संचालकांचा सत्कार
  • एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
  • आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दिल्या सूचना

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली आहे. त्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (Eknath Khadse News)

‘राज्यात आपली सत्ता आहे म्हणून आपण निवडून येऊ, अशी हवा डोक्यात शिरू देऊ नका. अशा हवेवर कधीही निवडणूक जिंकता येत नाही. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी आतापासूनच कसून तयारीला लागा,’ अशा सूचना एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठं यश मिळविलं आहे. या विजयी उमेदवारांचा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.

Omicron Variant: करोनाच्या नव्या स्ट्रेनचा मुंबईला किती धोका?; चहल यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

यावेळी पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘गावपातळीवर आपली ताकद वाढली तर विधानसभेत आपल्या पक्षाच्या आमदारांचा आकडा वाढू शकतो. राज्यात आपलं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण आहे. शरद पवारांसारखा मोठा नेता आहे, अशी हवा तयार होते. मात्र या हवेवर निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करा.’

Omicron Variant Updates: नव्या स्ट्रेनने मुंबईचं टेन्शन वाढवलं; मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातून निर्देश दिले आणि…

या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, रोहिणी खडसे खेवलकर, संजय पवार, घनश्याम अग्रवाल यांच्यासह अन्य सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान, या सत्कार सोहळ्याला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे नवनियुक्त संचालक संजय पवार, धरणगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार मनिष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, विलास पवार, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती .

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here