तरुणीचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. या तरुणीचे वय २० ते २५ वर्षे वयोगटातील असून डोक्यात मारून आणि गळयावर वार करून हत्या करण्यात आली. इतकेच नाही तर हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. या अहवालानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.
तरुणीची ओळख पटली नसल्याने सर्व पोलिस ठाण्यातील बेपत्ता झालेल्या तक्रारींची माहिती घेतली. सर्व पोलिसांना या मृतदेहाचे फोटो पाठविण्यात आले आणि खबरे देखील कामाला लावले. तपासाकरिता पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी देवनार आणि कुर्ला परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. रिझवान शेख, फैझल शेख अशी या दोघांची नावे असून रिझवान आणि या तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. या तरुणीने लग्नासाठी रिझवानकडे तगादा लावला होता. लग्न करायचे नसल्याने रिझवान याने फैझल याला सोबत घेऊन या तरुणीची हत्या केल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times