हायलाइट्स:

  • मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये धक्कादायक प्रकार
  • शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे
  • कुटुंबीयांनी ग्रामस्थांसह शाळेत दिली धडक
  • आरोपी शिक्षकाला केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल

बैतूल: मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एका सरकारी शाळेच्या शिक्षकाने शुक्रवारी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना समजताच, त्यांनी शाळेत धाव घेतली. कुटुंबीयांसोबत शाळेत आलेल्या ग्रामस्थांनी शिक्षकाची धुलाई केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. शिक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बैतूलच्या चिचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी शाळेतील वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने अश्लील चाळे केले. त्याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. सोबत ग्रामस्थही शाळेत येऊन धडकले. त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधित शिक्षकाला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस आणि शाळेतील पदाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली.

शिक्षिकेसोबत करायचा अश्लील वर्तन; सहकारी शिक्षकाच्या त्रासाला वैतागून पीडितेने…
भयंकर घटना ! वहिनी मोबाइलवर बोलत होती; संतापलेल्या दीराने उचलले टोकाचे पाऊल

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आरोपी शिक्षकाने याआधीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे. यावरून त्याच्या अनेकदा बदल्याही झाल्या आहेत. चिचोलीच्या सरकारी शाळेत या शिक्षकाविरोधात यापूर्वीही अशी तक्रार आली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला समज देऊन सोडून दिले होते. शुक्रवारी त्याने पुन्हा अशाच प्रकारचे कृत्य केले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच, विभागीय शिक्षण अधिकारी, प्राचार्य आणि इतर पदाधिकारी शाळेत पोहोचले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीरज सोनी यांनी सांगितले की, पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

बलात्कारपीडित १५ वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; ४० दिवसांनंतर बाळाचा गळा आवळून केला खून

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here