१०२ वर्षांच्या आजी रोज करतात योगा आणि व्यायम, उत्तम आरोग्यासाठी वाचा प्रेरणादायी कहानी – hingoli news 102 year old grandmother does yoga and exercise every day
हिंगोली : नियमित व्यायाम ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. निरोगी जगण्यासाठी जीवनात व्यांयमाची नितांत गरज आहे. व्यायाम करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही हिंगोलीच्या आजीने पटवून दिले आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रमाबाई तुकारामबुवा आजेगांवकर आज रोजी अजीच वय १०२ वर्ष आहे. मात्र वयाच्या शंभरीत नंतरही तरुणाला लाजवेल असा व्यायाम आणि योगासने करतात. गेल्या ७५ वर्षापासून त्यांचा हा व्यायामाचा दिनक्रम अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे. वयाच्या शंभरी नंतर सुरू असलेला त्यांचा हा उपक्रम भरात चर्चेचा विषय बनला आहे.
वयाच्या १०२ व्या वर्षीही आजीबाई शरीर स्वास्थ्यासाठी योगा करतात. सकाळी पाच वाजता पासून त्यांची दिनचर्या सुरू होते. सहा ते साडेसहा अर्धा तास योगा करतात. त्यानंतर देव पूजेला सुरुवात होते. सकाळी साडेअकरा वाजता भोजन, व त्यानंतर वामकुक्षी, त्यानंतर सायंकाळी भोजन व शक्य तितक्या लवकर झोप हा त्यांचा दिनक्रम आहे. मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म या शंभर वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले मात्र त्यांच्या दिनक्रमात कधीही खंड पडला नाही. आजही त्यांना चष्मा लागलेला नाही, वृत्तपत्र व इतरतर पुस्तकांचे तसेच ग्रंथाचे वाचन त्या करतात. तसेच सकाळी देवदर्शनासाठी कुणाचाही आधार न घेता मंदिरात जातात. विशेष म्हणजे १०२ वय झाल्यानंतरही त्यांच्या हातात काठी आली नाहि. गावातील जुनेजाणते व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जुन्या काळातील अनेक आठवणींचा ठेवा या आजीबाई कडे असून दुपार च्या पतवंड यांना सोबत घेऊन त्या जुन्या आठवणी देखील सांगतात.
जुन्या काळातील परिस्थिती व सध्याची परिस्थिती यामध्ये झालेला अमुलाग्र बदल त्या सांगतात. केवळ आजेगावच नव्हे तर परिसरातील गावकरी देखील त्यांना जेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आदराने मान देतात. आजीबाईंना ५ मुली, व २ मुले असून ११ नातवंडे व ६ पतवंडे आहेत. व्यायाम करून तंदुरुस्त राहण्याचा सल्ला आजीबाई देतात, स्वताच्या प्रकृतीसाठी दिवसातील किमान अर्धा तास तरी व्यायामासाठी द्यावा अशही आजीबाई सांगतात.