अपहरण करुन कपाटात कोंडलं आणि…, औरंगाबादमध्ये २ वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर – kidnapped and locked in a cupboard terrible thing happened to 2 year old girl in aurangabad
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील औषधी भवन परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीचा अपहरण करून तिला घरात कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर अपहरण करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिले आहे. तर काही काळ शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच या घटनेनंतर परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा पाहायला मिळाले.
शहरातील औषधी भवन परिसरात काही दिवसांपूर्वी एक ४२ वर्षीय व्यक्तीने भाडेतत्त्वावर घर घेऊन तिथे राहायला आला होता. मात्र सुरवातीपासूनच त्याच्या हालचाली स्थानिकांना खटकत होत्या. पण नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान शनिवारी याच परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील दोन वर्षांची मुलगी अचानकपणे गायब झाली. मुलगी घरात, अंगणात आणि परिसरात शोधूनही मिळत नसल्याने मुलीच्या आई-वडिलांची चिंता वाढली. याचवेळी काही नागरिकांना एका घरातून लहान मुलीच्या रडण्याचे आवाज ऐकू आला. म्हणून घरात जाऊन पाहणी केली असता हरवलेली मुलीला एका कपाटात कोंडून ठेवण्यात आले होते. Weather Alert : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे ४ दिवस धोक्याचे
विशेष म्हणजे ज्या घरात ही मुलगी सापडली ते घर वस्तीत राहण्यासाठी आलेल्या त्या संशयित व्यक्तीचे होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा व्यक्ती सापडताच नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. एवढंच नाही तर पोलीस व्हॅनमधून नेत असतानाही नागरिकांनी त्या व्यक्तीला चांगलेच फटके दिले. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीची सुटका करून ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.