नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये जेव्हापासून टी-२०चा समावेश झाला आहे तेव्हापासून खेळाचा वेग वाढला आहे. त्यामुळेच ५० षटकांची वनडे मॅच देखील अनेकांना कंटाळवाणी वाटू लागली आहे. सध्या टी-२०ला मोठा प्रेक्षकवर्ग असला आणि त्याची लोकप्रियता देखील जास्त असली तरी टी-२०च्या पुढे म्हणजे आता टी-१० ला सुरुवात झाली आहे. युएईमध्ये टी-१० लीग सुरू असून या स्पर्धेत एक मोठी दुर्घटना झाली पण वेळ चांगली होती म्हणून दुखापत झाली नाही.

वाचा-

अबुधाबी टी१० लीग स्पर्धेत चेन्नई ब्रेव्स आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यात मॅच सुरू होती. या सामन्यात फलंदाजाने मारलेला चेंडू फिल्डरकडे गेला. त्याने तो सीमेरेषेवरून थ्रो केला. पण चेंडू कोणत्याही फिल्डिरकडे किंवा विकेटवर लागण्या ऐवजी तो यांच्या डोक्याला लागला. डार यांनी चेंडू लागू नये यासाठी खुप प्रयत्न केला पण तो त्यांच्या डोक्याला लागला. चेंडू डोक्याला लागल्यानंतर डार थोडे घाबरले आणि त्यांनी तातडीने टोपी बाहेर काढली.

वाचा-

डार यांच्या मदतीला त्याच्या शेजारी असलेला खेळाडू तातडीने आला. जेथे चेंडू लागला आहे त्या ठिकाणी त्याने चोळून दिले. तेवढ्यात नॉर्दर्न वॉरियर्सचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी डार यांच्याशी चर्चा केली. थोड्यावेळात डार पूर्णपणे ठिक झाले. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा-

मैदानावर दुखापत होण्याची डार यांची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्यांना दुखापत झाली आहे. पाहा या आधीच्या घटनेचा व्हिडिओ

या सामन्यात नार्दर्न वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १५२ धावा केल्या. उत्तरादाखल चेन्नई ब्रेव्सला १० षटकात १३३ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here