एसटी बस आंदोलन: निलंबनाची ऑर्डर पाहताच एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली, राज्यात आंदोलन पुन्हा चिघळलं – seeing the suspension order the health of the st employee deteriorated
धुळे : राज्यात अद्यापही एसटी कामगारांचं आंदोलन काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलक ठाम असून सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. अशाच शासनानेही आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचा इशारा दिला आहे. पण असं न झाल्यामुळे आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे धुळ्यात मात्र एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
धुळे बस आकारातील ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर एका चालकाचे प्रकृती खालावली. निलंबनाची ऑर्डर पाहिल्यानंतर मनोहर भास्कर पाटील या चालकाची प्रकृती खालावली. त्यांना अचानक भोवळ आल्याने ते त्याठिकाणी खाली कोसळले. जवळच बस आगार प्रमुखांचे कार्यालय असताना, त्यांनी पाटील यांच्या प्रकृतीची साधी विचारपूसही केली नाही. Weather Alert : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे ४ दिवस धोक्याचे आंदोलन कर्मचाऱ्यांनी अॅम्बुलन्स बोलून पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. आंदोलन कर्मचारी हे माणसा आहेत, अतिरेकी नाहीत अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली. जेवढे निलंबित कर्मचाऱ्यांचे होते त्यांचा उपरोधात्मक सत्कारही करण्यात आला. शासन आडमुठे धोरण घेत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. ठराविक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात ऐवजी शासनाने सर्वच कर्मचाऱ्यांना एकत्र निलंबित करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.