जळगाव : चाळीसगाव शहरातील आनंदवाडी भागात एकाच्या घरी आलेल्या चार वर्षी चिमुरडीला ‘ बिस्कीटचा पुडा ’ घेवून देता असे सांगून निर्जनस्थळी नेत तिच्यावर अमानूषपणे अत्याचार केल्याची घटना दि,२८ रोजी मध्यरात्री १.२५ वाजेच्या सुमारास घडली आहे. संशयित पीडित मुलीचा दुरचा नातेवाईक असल्याचे वृत्त असून नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अल्पवयीन तरुणीवर दोघां तरुणांनी अत्याचार केल्याच्या घटनेला आठ दिवसात उलटत नाही तोच चार वर्षीय चिमुकलीवर बलात्काराची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील आनंदवाडी भागात एकाच्या घरी सावळाराम भानुदास शिंदे(२७) रा. लोंढरे ता.नांदगाव, जि. नाशिक हा नातेवाई आला होता. घरी नातेवाई आल्यामुळे त्याचा आदरतिथ्य करण्यासाठी रात्री त्याला जेवण-खावण झाले. त्यानतंर त्याने घरातील चार वर्षीय चिमुरडीला बिस्कीटा पुडा खायला घेवून देतो असे सांगून सोबत नेले.

मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म
रेल्वे स्टेशनच्या बाजुस निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अमाणूषपणे अत्याचार केला. नंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आल्याने मातेने आरडाओरड केली. त्यामुळे सावळाराम भानुदास शिंदे( २७) पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच, लोकांनी पकडून त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांना स्वाधीन केले.

पोलिसांनी चिमुररडीला चाळीसगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय दाखल केले असता, वैद्यकिय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी बालिकेवर अत्याचार झाल्याचे सांगत बालिकेला इजा झाल्याने तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चिमुरडीच्या आईच्या फिर्यादीवरुन सावळाराम भानुदास शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.

अपहरण करुन कपाटात कोंडलं आणि…, औरंगाबादमध्ये २ वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here