हायलाइट्स:
- भाजप खासदार गौतम गंभीरला पुन्हा धमकी
- आठवडाभरात तिसऱ्यांदा धमकीचा इमेल
- आयएसआय काश्मीर संघटनेकडून मेल आल्याची तक्रार
- गौतम गंभीरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली
धक्कादायक बाब म्हणजे, गौतम गंभीरला आठवडाभरात तिसऱ्यांदा धमकीचा इमेल पाठवण्यात आला आहे. यापूर्वी मेलद्वारे गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारा इमेल पाठवण्यात आला होता. गंभीरला २३ नोव्हेंबर रोजी रात्री पहिला धमकीचा इमेल पाठवण्यात आला होता. त्यात त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गंभीरने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबरला पुन्हा त्याला एक मेल मिळाला. त्यात ‘कालच तुझी हत्या करणार होतो, मात्र, तू वाचलास. काश्मीरपासून दूरच राहा’ असे त्या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर एका मेलमधून गंभीरच्या घराबाहेरील एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. हे धमकीचे मेल आयएसआय काश्मीरने दिल्याचा आरोप गंभीरने केला होता.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणून संबोधले होते. या त्यांच्या वक्तव्यावर २० नोव्हेंबरला गौतम गंभीर याने टीका केली होती. पंजाबचे नेते सिद्धू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होताा. त्यात एक पाकिस्तानी अधिकारी इम्रान खान यांच्या वतीने त्यांचे स्वागत करताना दिसत होता. त्यावेळी इम्रान खान मोठ्या भावासारखे आहेत, असे बोलताना सि्द्धू दिसतात. त्यावर गंभीरने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
सिद्धू यांची मुले भारतीय लष्करात असते, तर ते करतारपूर साहिबमध्ये इम्रान खान यांना आपला मोठा भाऊ म्हणाले असते का? असा सवाल गंभीरने केला होता. सिद्धू गेल्या महिनाभराच्या कालावधीत काश्मीरमध्ये ४० नागरीक आणि जवानांच्या हत्येवर एक चकार शब्द काढत नाहीत, असेही गंभीर म्हणाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times