हायलाइट्स:
- मांजरेकरांच्या वागण्यावर भडकले नेटकरी
- सोनालीसोबतच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी घेतला आक्षेप
- सोनालीला बोलण्याची संधी न दिल्याचा मांजरेकरांवर आरोप
आईने मंगळसूत्र विकून मुलीला पाठवलं ‘मी होणार सुपरस्टार’मध्ये

चावडीवर विशाल आणि सोनाली यांच्यातील वादाची ठिणगी चांगलीच पेटली होती. त्यात विशाल सोनालीवर अनेक आरोप करत होता. सोनालीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं देखील त्याने म्हंटलं. परंतु, विशालच्या आरोपांवर सोनाली जेव्हा स्पष्टीकरण देत होती तेव्हा मांजरेकर तिला अडवत होते. तुला नंतर बोलायला मिळेल असं सांगत होते. त्यामुळे सोनाली तिची बाजू मांडू शकली नाही. त्यामुळे सगळ्यांना सोनाली चुकीची आहे असं दिसलं. त्यामुळेच नेटकरी मांजरेकरांवर प्रचंड चिडले आहेत. सोनालीला बोलूचं दिलं नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

अनेक नेटकऱ्यांच्या मते, विशालने सोनालीवर आरोप केले तेव्हा एका एका आरोपाचं खंडन करण्याची संधी सोनालीला मिळायला हवी होती. मात्र मांजरेकर सोनालीवर प्रचंड भडकले आणि तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. अनेकदा तिला दरवाज्याबाहेर आणि बेडरूममध्ये उभं राहायला लागेल असं सांगण्यात आलं. यामुळे सोनाली तिची बाजू मांडू शकली नाही आणि ती सगळ्यांसमोर चुकीची ठरली असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकांना मांजरेकरांचं सोनालीसोबतचं वागणं पटलेलं नाही. विशालची देखील यात तेवढीच चूक होती मुलीलाच का चुकीचं ठरवलं जातंय असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. तर विशालचे चाहते जास्त आहेत त्यामुळे मांजरेकरांनी सोनालीला टारगेट केलं, असंही नेटकरी म्हणत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times