दरम्यान, विक्रमसिंह याच्या मावस भावाच्या लग्नासाठी पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षिरसागर, त्यांची पत्नी आणि मुलासह विजापूरला गेले होते. याचाच फायदा घेवून चोरट्याने बंद घराचा कडी- कोयंडा आणि कुलूप तोडून घरातील दोन लाखाच्या रोकडसह ३ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. घरातील २ लाख ३० हजाराची रोकड आणि ७० हजाराचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाखाचा ऐवज कपाटातून चोरून नेला आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.
सोलापूर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.चोरट्यांनी नागरीकांची घरं, दुकान फोडणे, चेनस्नॅचिंग,घरातील मोबाईल चोरणे अशा घटनांत नागरिकांना हैराण करुन सोडले आहे. त्यातच मागील आठवण्यात एका महिला पोलीसाची मोपेड चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर आता थेट पोलीस निरीक्षकाच्या घरातच डल्ला मारून चोरट्यांनी आता पोलीसांना थेट आव्हान दिले आहे. मात्र, शहर पोलिसांनी गेल्या महिनाभरात एकही चोरीची उघडकीस आणली नाही याचे सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times