हायलाइट्स:

  • करिना कपूर अमिताभ बच्चन यांना समजत होती वाईट
  • अमिताभ यांनी काढली होती करिनाची समजूत
  • मातीने माखलेल्या करिनाचे अमिताभ यांनी धुतले होते पाय

मुंबई– बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं चित्रपटसृष्टीमध्ये मोठं योगदान आहे. अनेक चाहते बिग बींना देवाप्रमाणे पूजतात. या महानायकावर कधी कुणाचे पाय धुवायची वेळ आली असेल असं कुणाच्या डोक्यातही येणार नाही. परंतु, एकेकाळी अमिताभ यांनी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिचे पाय धुतले होते. करिना तिच्या अभिनयाइतकीच तिच्या फटकळपणासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु, हा किस्सा करिनाच्या लहानपणाचा आहे. जेव्हा करिना अमिताभ यांना वाईट समजत होती. शिवाय करिनाला दुखापतही झाली होती.

Video- KBC 13 च्या सेटवर श्वास लागेपर्यंत रडला John Abraham

अमिताभ यांचा पुकार’ चित्रपट १८ नोव्हेंबर १९८३ साली प्रदर्शित झाला. नुकतीच चित्रपटाला ३८ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अमिताभ यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली. या चित्रपटात रणधीर कपूर खलनायकाची भूमिका साकारत होते. चित्रीकरण गोव्याला सुरू होतं. एकेदिवशी चित्रीकरणाला छोटी करिनादेखील आली होती. त्यादिवशी अमिताभ रणधीर यांना लाथा बुक्क्यांनी मारणार होते. अमिताभ आपल्या वडिलांना मारत आहेत हे पाहून करिना धावतच वडिलांजवळ गेली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. या प्रयत्नात ती खाली पडली आणि करिनाच्या अंगाला माती लागली.

करीना कपूर

आपल्या वडिलांना मारणारे म्हणून करिना अमिताभ यांना वाईट समजू लागली. तर अमिताभ यांनी तिला उचलून बाजूला नेलं आणि तिची समजूत काढू लागले. अमिताभ यांनी करिनाला शांत केलं आणि हे सगळं खोटं असल्याचं सांगत तिचे मातीने माखलेले पाय धुतले. त्यानंतर करिनाचा अमिताभ यांच्यावर विश्वास बसला होता. बिग बींनी ही आठवण एक पोस्ट करत शेअर केली. करिना आणि अमिताभ यांनी एकत्र ‘कभी खुशी कभी गम’, ‘देव’ आणि ‘सत्याग्रह’ अशा अनेक चित्रपटात काम केलं.

Sonakshi Sinha Wedding: सलमानच्या घरची सून होणार सोनाक्षी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here