मुंबई– छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारा कार्यक्रम ” सोशल मीडियावर चर्चेत आहे. या आठवड्यात भरलेल्या बिग बॉसच्या चावडीवर आणि यांच्यातील वादाबद्दल चर्चा करण्यात आली. सोनालीने लग्न ठरल्याचं न सांगितल्याने विशालने सोनालीवर निशाणा साधला. महेश मांजरेकर यांनीही विशालची बाजू ऐकून घेत सोनालीला बोलण्याची संधी न दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच विशालने सोनालीवर केलेले आरोप ऐकून नेटकऱ्यांनी सोनालीला पाठिंबा दर्शवला आहे.

विशालने सोनालीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. सोनालीची बाजू ऐकल्यावर नेटकऱ्यांनी विशालला चुकीचं ठरवलं आहे.विशाल आता चुकीच्या पद्धतीने खेळत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एका युझर्स अनेक प्रतिक्रिया देत त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. एका युझरने सोनालीला पाठिंबा दर्शवत लिहिलं, ‘विशालला सोनालीबद्दल एवढं बोलायची गरज नव्हती. तू मित्र म्हणवत होतास ना तिचा.’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘विशाल आता खूप चुकीचा खेळतोय. मूर्खासारखं वागतोय. सोनालीबद्दल एवढं चुकीचं बोलायची गरज नव्हती. विशालचा खेळ आता संपला. आता तो जिंकू शकत नाही.’

आणखी एका युझरने लिहिलं, ‘विशाल तुला एका मुलीसोबत कसं बोलायचं याचं भान नाही. एका मुलीबद्दल एवढं सगळं चावडीवर बोलायची काय गरज होती. त्यामुळे तुझाच खेळ खराब झाला. तूझा मार्ग आता चुकतोय.’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘सोनाली तुझ्याबद्दल वाईट काहीच बोलली नाही. तू तिच्याबद्दल इतकं वाईट बोललास. तिला चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. विशालने माती खाल्लीये. आता आम्ही तुला सपोर्ट करणार नाही.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here