मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या विवाहबंधनात अडकणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून राऊत कुटुंबाची लगबग सुरू असून स्वत: संजय राऊत यांनी सपत्निक विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत त्यांना या लग्नसोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. या सोहळ्याआधी राऊत कुटुंबाकडून मुंबईत संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स व्हिडिओची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे.

उर्वशी राऊत यांच्या लग्नसोहळ्याआधी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आग्रह करत संजय राऊत यांना एका गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडलं. तसंच सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नृत्यात सहभागी व्हायला लावल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

Chhagan Bhujbal: ‘आमचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि…’; छगन भुजबळ यांचे महत्त्वाचे विधान

दुसरीकडे, या डान्स व्हिडिओवरून सोशल मीडियात उलट-सुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर असताना सत्तेत सहभागी असलेले नेते डान्स करत आहेत, असं म्हणत काहींनी टीका केली आहे.

दरम्यान, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी राऊत यांच्या कन्या पूर्वशी यांचा विवाह होत आहे. मल्हार नार्वेकर हे आयटी इंजिनियर आहेत. तसंच ते स्वतंत्र व्यवसायही करतात. पूर्वशी राऊत या देखील उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या त्या निर्मात्याही आहेत. २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या विवाहसोहळ्याला सर्वच राजकीय पक्षांतील दिग्गज नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here