हिंगोली : संपामध्ये सहभागी होणे, सूचना देऊनही कामावर न येणे, तसेच प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता शासन आदेशानुसार विभागीय कार्यालयाने आतापर्यंत जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, हिंगोली या तिन्ही आगारातून ९० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तर यामध्ये दोघा जणांना सेवामुक्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तिन्ही आगारातील चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. यासाठी विलीनीकरणाचा लढा सुरू आहे. १ नोव्हेंबरपासून या संपाला सुरुवात झाली. आज २९ व्या दिवशीसुद्धा एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तटपुंजी वेतन वाढ करून शासन संप मिटविण्याचा मार्गावर आहे.

Omicron Variant: महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; दक्षिण आफ्रिकेतून आलेला ‘तो’ प्रवासी करोना पॉझिटिव्ह
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडू पाहत आहे, कर्मचाऱ्यानी कामावर यावे म्हणून शासन दडपशाही करत असल्याचा आरोप देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे. या दडपशाहीला कर्मचारी आता घाबरणार नाहीत, संप पुढे असाच चालू राहणार असा एक मुखी निर्धार या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्मचाऱ्याने आदेशाचे पालन करावे असं एसटी मधील वरिष्ठांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांचं कीर्तन पुन्हा चर्चेत; आता केलं ‘हे’ विधान

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here