Coronavirus New Variant Cases in Mumbai: Man Detected Corona Positive Who Came From South Africa In Dombivli – पुन्हा चिंता वाढली! डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह | Maharashtra Times
डोंबिवली : दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron प्रकार) लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. पण यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा संसर्ग वााढून लॉकडाऊन होईल का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.
या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले आहे. अधिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. Omicron Variant: महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; दक्षिण आफ्रिकेतून आलेला ‘तो’ प्रवासी करोना पॉझिटिव्ह यामुळे त्याचे कुटूंबीय नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरनात राहत होता. त्याला ताप येऊ लागल्याने त्याची करोना टेस्ट केली असता करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने लॅबकडून याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच परदेशातून आलेला प्रवाशाला करोनाची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
या रुग्णाला पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे टेस्टचे नमुने उद्या जिनोम सिक्वेन्सीगसाठी मुंबई येथे प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत. अशात पुन्हा संसर्गाचा फैलाव सुरू झाला असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.