मुंबई : राज्यात पुन्हा एकदा नव्या संसर्गाने डोकं वर काढल्याने चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये समोर आलेल्या ओमिक्रॉन संसर्गामुळे आता पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमिवर आता राज्यात मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे, यामध्ये राज्यात निर्बंध लागू करणार का? यावर चर्चा करण्यात येणार आहे.
खरंतर, एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होती, पण याचा धोका वाढल्यामुळे हा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे किंवा या निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकतो. इतकंच नाहीतर राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का या सगळ्यावरही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली असून यामध्ये चर्चा करणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times