नवी दिल्लीःसंसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारा्ंना व्हीप बजावला आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसनेही खासदारांना व्हीप बजावला आहे. विरोधकांनी महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. यामुळे अधिवेशनात काय काय घडतंय त्याचे अपडेट्स वाचा…

– सर्व मुद्द्यांवर सरकार चर्चेसाठी तयारः PM मोदी

– राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली, तृणमूल काँग्रेस बैठकीपासून दूर

– काँग्रेसने राज्यसभेतील पक्षाच्या खासदारांची बोलावली बैठक

– केरळ आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज पोटनिवडणूक होणार

– काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव, शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी

– भाकपचे खासदार बिनॉय विश्वम यांची एमएसपीला कायदेशीर हमी देण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चेची मागणी

– लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची आज सकाळी साडेदहा वाजता होणार
– केंद्र सरकार या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक मांडणार

– तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत विधेयक मांडणार

– शेतकरी संघटनांनी एमएसपीवर हमी देणारा कायदा करण्याची मागणी केली आहे

– संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, सरकारच्या अजेंड्यावर २६ विधेयकं

संसद हिवाळी अधिवेशन 2021 लाइव्ह अपडेट्स

संसदेचं हिवाळी अधिवेशन… वाचा लाइव्ह अपडेट्स…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here