वर्धा : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशात प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याच्याा दोन आगारातून प्रत्येकी एक बस सुरू करण्यात आली आहे. विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. अशात राज्य शासनाकडूनही कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. या दोघांच्या वादात प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होत आहेत.

अधिक माहितीनुसार, आर्वी आगारातील एक तर पुलगाव आगारातील एक बस रस्त्यावर धावली. जिल्ह्याच्या एसटी आंदोलनात फूट पडली असून एकूण १० कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्येही एसटी बसेस पुन्हा सुरू होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. सध्या जिल्ह्याच्या पाचही डेपोत आंदोलन सुरू आहे. एकूण १४३० कर्मचारी संपावर होते त्यापैकी १० कर्मचारी परतले.

राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
जिल्ह्यात आतापर्यंत १५८ कर्मचाऱ्यांचे निलंबन तर ६१ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली आहे. रविवारी आंदोलन सुरू असताना दोन बसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात दोन बस रवाना करण्यात आल्या आहेत. ही प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

चंद्रकांत पाटील पोहोचले राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या घरी; पवारांना डिवचले, म्हणाले…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here