म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः घरावर सापांचा सावली असून गुप्त धन काढून देतो, मात्र, हा प्रकार कोणाला सांगितल्यास कोंबडा बनवून टाकू अशी धमकी देत तीन भोंदूबाबांनी एका कापड व्यापाऱ्याला तब्बल नऊ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार छावणी परिसरात उघडकीस आला. सीताराम महाराज, शंकर महाराज आणि आसिफ कुरेशी अशी भोंदूबाबांची नावे आहेत.

प्रकरणात शेख रफत शेख करीम यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार शेख रफत हे कपड्याचे व्यापारी आहेत. रफत आणि त्यांच्या पत्नीचे सतत भांडण होत असल्याने घरात अशांतता होती. परभणीच्या एका मित्राने त्‍यांना मानवत येथील सायलू महाराजांची भेट घेण्याचा सल्ला दिला. जून २०२१ मध्ये रफत, त्यांची पत्नी आणि मित्र हे मानवला गेले. परंतु सायलू महाराज ऐवजी त्‍यांना सीताराम महाराज भेटला. सीतारामने तुमच्यावर करणी केली आहे, असे सांगत औरंगाबाद येथे येऊन पाहणी करण्यासाठी ९६ हजार रुपयांची मागणी केली. त्‍यानूसार रफत यांनी पैसे दिले. त्यानंतर सीताराम महाराज, शंकर महाराज आणि इतर औरंगाबादमध्ये आले.

घरावर सापाचा साया आहे, घरात ९६ किलो गुप्त धन आहे ते काढून देण्यासाठी पुजा करावी लागेल असे म्हणाले. त्यांनी वेळोवेठी रफत यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असे तब्बल ९ लाख ९५ हजार २०० रुपये उकळले. परंतु, रफत यांच्या घरातून कोणतेही निघाले नाही. त्यांनी सीताराम महाराज यांची परभणी येथे जाऊन भेट घेतली आणि पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी माझ्याकडे अघोरी विद्या असून याची कोठेही वाच्यता केली तर कोंबडा बनविण्यात येईल, अशी धमकी दिली. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here