मुंबई उच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी पीटर मुखर्जीला सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करता यावे यासाठी त्या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगितीही दिली होती. मात्र, सीबीआयने अपिल केले नाही आणि जामिनाच्या अटींची पूर्तता झाली, त्यामुळे त्याची आज तुरुंगातून सुटका करण्यात आली. पीटरला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने अनेक अटी घातल्या.. पासपोर्ट सीबीआयकडे जमा करा, न्यायालयाच्या परवानगीविना देश सोडून जाऊ नका, मुलगी विधी व मुलगा राहुल यांच्यासह खटल्यातील अन्य साक्षीदारांशी संपर्क साधू नका, खटल्याच्या सुनावणीत तहकुबी घेऊ नका, खटल्याच्या सुनावणीत वारंवार तहकुबी घेतल्यास जामीन रद्द होण्याकरिता अर्ज करण्याची मुभा सीबीआयला राहील, अशा अटी न्यायालयानं घातल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times