मुंबई– संपूर्ण भारतात लॉकडाउन लागला आणि सगळी कामं जागच्या जागी थांबली. सिनेमागृह, मॉल, सगळंच बंद झालं. परंतु, आता सगळं सुरू झाल्यानंतर सिनेमागृहात पुन्हा प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. अशात बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली. मग मराठी चित्रपट मागे कसे राहतील. भन्नाट विषय घेऊन एकापाठोपाठ एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठमोळा अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मुख्य भूमिका असलेला ” देखील येत्या २८ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘लकडाऊन’ चित्रपटाची कथा त्याच्या नावातच दडलेली आहे. लॉकडाउनदरम्यान ठरलेलं एक लग्न करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात, याचं विनोदी चित्रण या चित्रपटात केलं गेलं आहे. ‘लकडाऊन’ या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवाला मिळणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झालं आहे. नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरनुसार, अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत आहेत. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना करावी लागलेली धावपळ म्हणजेच ‘लकडाऊन’ हा चित्रपट आहे.

इष्णव मीडिया हाऊसच्या ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवनात करण्यात आलं. या प्रदर्शनाला सचिन अहिर, रविंद्र मिर्लेकर यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here