अकोला: अकोला, बुलडाणा, वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक पराग कांबळे व रमेश बजाज यांची याचिका सोमवारी नागपूर हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. अकोला, बुलढाणा, वाशीम विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात भाजपातर्फे वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी २२ नोव्हेंबरला नामांकन अर्ज सादर केला.

सदर नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात आली आणि छाननी दरम्यान या मतदारसंघातील मतदारांपैकी एक असलेले नगरसेवक पराग मधुकर कांबळे यांनी भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाच्या मान्यतेवर आक्षेप नोंदवला व त्याचप्रमाणे रमेश सत्यनारायण बजाज यांनी देखील आक्षेप नोंदविला होता.

तुुम्ही आमचा पंचवीस वर्षांचा संसार मोडला, पण… गिरीश महाजनांचा जयंत पाटलांना टोला
रमेश बजाज हे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत, तर हे दोन्ही आक्षेप रिटर्निंग ऑफिसरने फेटाळले. रिटर्निंग अधिकाऱ्याने दिलेल्या आक्षेपांना नकार देण्यास अनुक्रमे पराग मधुकर कांबळे आणि रमेश सत्यनारायण बजाज यांनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात दोन स्वतंत्र रिट याचिकांद्वारे उमेदवारी अर्जाला आव्हान दिले होते. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने दोन्ही रीट याचिका फेटाळून लावल्या असल्याने आता या निवडणुकीत अजूनच चुरस वाढली आहे.

कारण, यावेळी ही निवडणूक दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेची आहे. गेल्या १८ वर्षापासून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया हे आमदार असून यावेळी भाजप आणि शिवसेनेची युवती नसल्याने दोन चागले मित्र आणि शेजारी हे एकमेकांच्या विरोधात उभे असून वसंत खंडेलवाल हे एक सराफाचे व्यापारी सुरवातीपासून भाजपसी जुडले आहेत. नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने ही निवडणूक ठाकरे विरुद्ध गडकरी अशीच चर्चा सर्व दूर आहे. तर दोन्ही उमेदवार एकमेकांवर ताशेरे ओढायला कुठलीच कसर सोडत नाहीत. सध्या निवडणूक आता चुरशीची होणार असून यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘संपाने गिऱ्हाइकं संपवली’, एसटी संपामुळे बसस्थानकातील दुकानदारांचे गणित बिघडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here