हायलाइट्स:

  • ट्विटरच्या संचालक मंडळाकडून एकमताने अग्रवाल यांनी सीईओ पदावर निवड
  • पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीतून बीटेकचे पदवी शिक्षण पूर्ण केले
  • २०११ सालापासून पराग अग्रवाल ट्विटरशी निगडीत आहेत

नवी दिल्ली : ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अमेरिकन आयआयटी मुंबईचे पदवीधर पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीईओ जॅक डोरसी यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरच्या संचालक मंडळाने एकमताने अग्रवाल यांनी या पदावर निवड केली. अग्रवाल यांच्या निवडीमुळे आता जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एका कंपनीच्या नेतृत्त्वाची जबाबदारी भारतीयाकडे सोपविण्यात आली आहे.

कोण आहेत पराग अग्रवाल?

अग्रवाल हे एका दशकापासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. सॉफ्वेअर इंजिनीअर म्हणून त्यांनी ट्विटरची नोकरी स्वीकारली. त्यानंतर ते २०१७मध्ये ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्त झाले. या काळात त्यांनी ट्विटरच्या तंत्रज्ञान विषयक धोरणात आमूलाग्र बदल करत मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून यूजर्सचा अनुभव अधिक समृद्ध केला. याचबरोबर उत्पन्नातही वाढ करण्यास मदत केली. यामुळे जॅक यांच्यानंतर अग्रवाल यांनी नियुक्ती करण्यात आली.

Omicron ला मात देण्यासाठी नव्या लशीची निर्मिती, ‘या’ कंपनीनं घेतला पुढाकार
PHOTO: नवा करोना व्हेरियंट Omicron चा पहिला फोटो जाहीर
राजीनामा देताना जॅक भावूक

तब्बल १६ वर्षे काम केल्यानंतर आपला राजीनामा देताना ट्विटरचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ जॅक म्हणाले की, संस्थापकांनी आता कंपनीपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. पराग यांच्यावर माझा खूप विश्वास असून, गेल्या दशकातील त्यांचे काम हे परिवर्तन करणारे होते. यामुळे त्यांच्याकडील कौशल्याचा मला खूप आदर आहे. यामुळे आता त्यांनी नेतृत्व करावे, असेही जॅक यांनी नमूद केले.

यानंतर जॅक हे २०२२पर्यंत संचालक मंडळावर काम करत राहणार आहेत. जॅक हे एका पेमंट कंपनीचेही प्रमुख आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये त्यांना विशेष रस निर्माण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी २००८मध्ये त्यांनी सीईओ पदावरून राजीनामा दिला होता. यानंतर २०१५मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी अग्रवाल यांची नियुक्ती जाहीर करताना मंडळाने कंपनीच्या स्वतंत्र मंडळाच्या अध्यक्षपदी ब्रेट टेलर यांचीही नियुक्ती करण्यात आली.

जॅक यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो आहे. माझ्या नेतृत्त्वावर संचालक मंडळाने जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो. जॅक यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ट्विटरला ज्या उंचीपर्यंत नेले ती कायम ठेवून अधिक क्षमतेने काम करण्यावर माझा भर असणार आहे.

पराग अग्रवाल, सीईओ, ट्विटर

जगभरात तेजीनं Omicron फैलावण्याचा धोका, WHO कडून ‘हाय रिस्क’ जाहीर
Omicron ची लक्षणे काय आहेत? दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरने सांगितले…
कोण आहेत पराग अग्रवाल?

पराग अग्रवाल हे भारतीय असून त्यांनी आयआयटी मुंबईतून बीटेकचे पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पूर्ण केले. यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट रीसर्च, एटी अॅण्ड टी आणि याहू रीसर्च यांसारख्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर सन २०११मध्ये ते ट्विटरमध्ये रुजू झाले होते. नोव्हेंबर २०२१मध्ये त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. याआधी सोशल मीडियाच्या खुल्या आणि विकेंद्रीत प्रमाणांची निर्मिती करण्यासाठी ओपनसोर्स आर्किटेक्ट विकसित करणाऱ्या ट्विटरच्या ‘प्रोजेक्ट ब्लूस्काय’ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या यशस्वी कामगिरीनंतर त्यांनी यापदी नियुक्ती करण्यात आली.

New Zealand: प्रसुती वेदनेत सायकलवरून महिला खासदारानं गाठलं रुग्णालय आणि…
PNB Scam: पळपुटा मेहुल चोक्सी भेदरलेल्या अवस्थेत, सतावतोय ‘हा’ धोका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here