अमरावती : अमरावती येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी नागपूर जिल्ह्यातील तनुश्री करलुके या ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळला तर या मृतदेहाजवळ १० महिन्याची चिमुकली व एक ४ वर्षीय मुलगा जिवंत दिसून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
बाळाची भूक भागवल्यानंतर हे बाळ शांत झाले. त्यानंतर कालपासून तब्बल २४ तास गुंजन गोळे या महिलेने दोन्ही बाळाचा सांभाळ करत आईची भूमिका पार पाडली तर आज दुपारी मृत महिलेचे नातेवाईक आल्यानंतर त्या दोन्ही बाळाला नातेवाईकांच्या स्वाधीन केले गुंजन गोळे यांनी सामाजिक भान दाखवत माणुसकीचा परिचय करून दिला.