हायलाइट्स:

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पुन्हा दिलासा
  • मरीन ड्राइव्ह खंडणी प्रकरणी जारी आजामीनपात्र अटक वॉरंट रद्द
  • कोर्टात हजर राहून वॉरंट रद्द करण्याची अर्जाद्वारे केली होती विनंती
  • मरीन ड्राइव्ह खंडणी प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाने दिली होती तक्रार

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (अनिल देशमुख) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (परमबीर सिंग) यांना आज, मंगळवारी मोठा दिलासा मिळाला आहे. मरीन ड्राइव्ह खंडणी प्रकरणात मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले आजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह खंडणी प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह यांच्यासह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया व सुनील जैन यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपाखाली मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात न्यायालयाने वारंवार समन्स बजावून देखील हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. आज, मंगळवारी न्यायालयात हजर राहून अटक वॉरंट रद्द करण्यात यावे, अशा विनंतीचा अर्ज दिल्यानंतर न्यायालयाने त्यांचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून त्यांना दिला दिला आहे.

नवाब मलिकांचा पुन्हा धमाका; फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर म्हणाले, ‘चिडिया चुग..’

महापौरांनी घेतला मुंबई विमानतळावरील करोना तपासणीचा आढावा

याच प्रकरणात नंदकुमार गोपाळे व आशा कोरके हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जांवर कालच सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने ७ डिसेंबरला निर्णय देणार असल्याचे संकेत दिले.

परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्याची माहिती न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने परमबीर यांना समन्स बजावले होते. तरीही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. यामुळे त्यांना दिसताक्षणी अटक करण्याचे अधिकार मिळाले होते. मात्र, तरीही काही थांगपत्ताच लागत नसल्याने त्यांना अटक करणे पोलिसांना शक्य झाले नाही. दरम्यान सात महिन्यांनंतर परमबीर हे समोर आले. प्रथम त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण मिळवले आणि त्यानंतरच ते मुंबईत पोहोचले. परमबीर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह खंडणी, गोरेगाव खंडणी आणि ठाणे खंडणी अशा तीन प्रकरणांत त्या-त्या कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यापैकी ठाणे कोर्टाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या हजेरीनंतर वॉरंट रद्द केले. आज मरिन ड्राइव्ह प्रकरणात वॉरंट रद्द झाले. आता उद्या गोरेगाव प्रकरणात वॉरंट रद्द होण्याबरोबरच त्यांना फरार घोषित केल्याचा आदेशही रद्द होण्याची शक्यता आहे. गोरेगाव प्रकरणात न्यायालयाने परमबीर यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतरच त्यांच्यावर न्यायालयासमोर हजर होण्यासाठी दबाव निर्माण झाला. त्यानुसार ते आता प्रत्येक प्रकरणात न्यायालयात हजेरी लावत आहेत.

param bir singh and sachin waze: धक्कादायक! परमबीस सिंह- सचिन वाझेंमध्ये तासभर चर्चा; काँग्रेसला कटाचा संशय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here