म. टा. प्रतिनिधी, ठाणे

दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये सापडलेल्या करोनाच्या ‘ओमिक्रॉन‘ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार ठाणे महापालिकेकडून अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. १४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान या भागातून ठाण्यात आलेल्या सात नागरिकांची यादी महापालिकेस देण्यात आली आहे.

महापालिकेकडून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर तपासणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. ज्या व्यक्ती येऊन १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल तर त्यांच्याविषयी काळजीचे कारण असणार नाही.

पुणेकरांची धाकधूक वाढली! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे, अहवालाची प्रतीक्षा

ठाणे शहरातील करोनाची लाट ओसरली असली तरी परदेशातून येणाऱ्या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सोमवारी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात सतर्कतेच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून येणाऱ्या निर्देशानुसार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून जिल्ह्यातील परदेशातून येणाऱ्या नागरिकांशी महापालिकांच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. अशा नागरिकांना शोधून त्यांचे विलगीकरण करणे, त्यांची तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह असल्यास त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. गेल्या १४ दिवसांतील सर्व परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी प्राप्त होत असल्याप्रमाणे त्यांची शोध मोहीम राबवून उपाययोजना करण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

omicron : मोठा दिलासा! देशात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही, केंद्राची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here