पुणे: करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर वाढत्या चाललेल्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी व त्यांच्यावरील उपचारासाठी जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यातील काही बंद करण्यात आले होते. मात्र, आता जगातील १२ देशांमध्ये वाढलेल्याओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिकेनं पुन्हा एकदा कोविड सेंटर खुली करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गरज भासल्यास शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर देखील सुरू करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

शहरातील करोना रुग्णसंख्या कमी असल्यामुळे महापालिकेनं जम्बो कोविड सेंटर व दळवी रुग्णालयातील करोना उपचार बंद केले आहेत. मात्र, सध्या दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन विषाणू जगभरात वेगानं फैलावत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार सतर्क झाले आहे. आवश्यकतेनुसार निर्बंध देखील घालण्यात येत आहेत. पुणे महापालिकेनं देखील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. त्याचबरोबर, उपचारांच्या सुविधा देखील सज्ज करण्यात येत आहेत.

वाचा:

पुणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. जम्बो कोविड सेंटरमधील बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू कक्षाची तपासणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. डॉ. आशिष भारती यांनी सांगितले की, ‘शहरात करोनाची स्थिती सामान्य आहे, पण गरज भासल्यास महापालिका दोन दिवसांत जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करू शकते अशी तयारी ठेवण्यात आली आहे. जम्बो कोविड सेंटरमधील सगळ्या उपकरणांची तपासणी करण्यात आली असून काही उपकरणांची गरज लागल्यास ती देखील तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील.’

वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here