हायलाइट्स:

  • सांगलीत काळाजी पिळवटून टाकणारी घटना
  • क्रिकेट खेळून घरी परतताना १२ वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू
  • घटनेनं परिसरात हळहळ

सांगली : ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून झालेल्या अपघातात एक मुलगी जागीच ठार झाली आहे. सांगलीतील हरिपूर रोडवर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा अपघात (सांगली अपघात) झाला. अन्वेशा विसपुते (वय १२, रा. पाटणे प्लॉट, सांगली) असं मृत मुलीचं नाव आहे. क्रिकेट खेळून घराकडे परतताना तिची सायकल उसाच्या ट्रॉलीखाली गेल्याने हा अपघात घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अन्वेशा विसपुते ही मुलगी मैत्रिणींसोबत क्रिकेट खेळायला गेली होती. सायकलवरुन घराकडे परत जाताना हरिपूर रोडवर तोल जाऊन ती पडली. याच वेळी बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

‘सर्व काही मोबाइलमध्ये’ असं स्टेटस ठेवून केली आत्महत्या; प्रत्यक्षात घडलं वेगळंच!

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून ऊस वाहतूक होत असल्याने सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसा ऊस वाहतुकीसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here