
पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ते २०११ पासून ट्विटर कंपनीत काम करत आहेत. पराग अग्रवाल २०१७ पासून ट्विटर कंपनीच्या CTO पदाचा कार्यभार पाहत होते. पराग यांचे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सोबत खास नाते आहे. याची पुष्टी श्रेयाच्या काही वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटवरून झाली, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रेयाने त्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘लहानपणीचा आणखी एक मित्र पराग अग्रवाल. त्याला खायला आणि प्रवास करायला आवडतो. स्टॅनफोर्डचा हुशार मुलगा. काल त्याचा वाढदिवस होता. कृपया सर्वांनी त्याला शुभेच्छा दया.’ श्रेयाचे आणखी काही ट्वीट व्हायरल होत आहेत, ज्यात श्रेया आणि पराग यांचे काही फोटोही आहेत. अलीकडेच पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे नवे सीईओ झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा श्रेयाने त्यांना शुभेच्छा देत त्याच्या यशाचा अभिमान असल्याचंही तिने सांगितलं.

पराग अग्रवाल यांनी IIT मुंबई मधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं होतं. त्याव्यतिरिक्त त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट केलं. तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना पराग यांनी मायक्रोसॉफ्ट,याहू आणि एटी अँड टी सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये इंटर्नशिपही केली होती.