हायलाइट्स:
- तहसीलदार कार्यालयासमोर तरुणाची आत्महत्या
- साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल
- पोलीस अधिकाऱ्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी
घनवट याच्याकडे आढळून आलेल्या चिठ्ठीत खासगी साखर कारखान्यामुळे प्रदूषण होऊन शेतीचं नुकसान होत असून तक्रार केल्याने कारखान्याचे अधिकारी त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांनी शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगर या साखर कारखान्याचे अधिकारी विष्णू खेडेकर, अर्जुन मुखेकर व जगन्नाथ रघुनाथ झाडे यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांवरही झाले आहेत आरोप
सुरुवातीला चिठ्ठी सापडली नसल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. घनवट याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियात ‘सर्व काही मोबाईलमध्ये’ असं स्टेटस ठेवलं होतं. त्याच्या शेताशेजारीच औरंगाबाद जिल्ह्यातील एका उद्योजकाचा साखर कारखाना आहे.
या कारखान्याचा शेतीला त्रास होत असून त्याविरोधात पाठपुरावा करताना त्रास झाल्याचं घनवट याने नमूद केलं आहे. याशिवाय कारखान्याच्या अधिकाऱ्यांची नावेही दिली असून या विरोधात तक्रार करूनही पोलिसांनीही दखल न घेतल्याचं त्यात म्हटलं आहे.